अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:23 AM2021-04-01T04:23:45+5:302021-04-01T04:23:45+5:30

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील सिद्धाप्पा धोंडाप्पा कोठे यांचा २६ एप्रिल २०१४ रोजी अज्ञात लोकांनी खून केला होता. या प्रकरणी ...

Three convicted of murder in an immoral relationship have been sentenced to life imprisonment | अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा

अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा

Next

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील सिद्धाप्पा धोंडाप्पा कोठे यांचा २६ एप्रिल २०१४ रोजी अज्ञात लोकांनी खून केला होता. या प्रकरणी मयत सिद्धाप्पा कोठे यांचे भाऊ रायाप्पा धोंडिबा कोठे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण व सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. काळे यांनी केला. मयत सिद्धाप्पा कोठे याची पत्नी कमळाबाई हिचे गावात राहणारा दीपक आण्णासाहेब मेटकरी याच्याशी अनैतिक संबंध होते. त्या संबंधास सिद्धाप्पा अडसर ठरत होता, म्हणून आरोपी दीपक मेटकरी याने त्याचा मित्र रामचंद्र म्हाळप्पा पेटरगे व कमळाबाई कोठे यांच्या मदतीने सिद्धाप्पा याच्यावर वार करून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यावरून पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

न्यायालयात घटनेच्या आदल्या दिवशी सर्व आरोपींना एकत्र पाहणारी मयताची मुलगी लक्ष्मीबाई अनिल मासाळ, फिर्यादी रायाप्पा कोठे, मयताचा मुलगा भपण्णा कोठे, मयताची आई सायव्वा कोठे, घटनेच्या वेळी मयतासह आरोपींना एकत्र पाहिलेला मलाप्पा तिपण्णा येडडे, शवविच्छेदन करणारे श्रीनिवास कोरुलकर, तपासी अधिकारी चव्हाण व काळे यांच्यासह एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.

मयत सिद्धाप्पा यांचा मृत्यू अपघाती नसून तो सदोष मनुष्यवध असून पुरावा एकमेकांशी सुसंगत आहे, असा युक्तिवाद सरकारतर्फे ॲड. सारंग वांगीकर यांनी केला. दोषारोपपत्रात आलेला पुरावा, साक्षीदारांच्या जबाबाचे अवलोकन करून न्यायाधीश बावीस्कर यांनी दीपक आण्णासाहेब मेटकरी, रामचंद्र म्हाळप्पा पेटरगे व कमळाबाई कोठे या तिन्ही आरोपींना आजन्म कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. टी.यू. सरदार व ॲड. दत्तात्रय यादव यांनी काम पाहिले.

Web Title: Three convicted of murder in an immoral relationship have been sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.