तिघांचा महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; सहाजणांची पती व सासऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:25 IST2021-05-25T04:25:44+5:302021-05-25T04:25:44+5:30

यातील महिला रविवारी त्यांच्या शेतातील वीज वितरण कंपनीच्या डीपीजवळ उसाची दारे धरण्यासाठी गेली होती. दुपारी २ च्या सुमारास विजय ...

Three attempted overdose on a woman; Beating husband and father-in-law of six | तिघांचा महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; सहाजणांची पती व सासऱ्याला मारहाण

तिघांचा महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; सहाजणांची पती व सासऱ्याला मारहाण

यातील महिला रविवारी त्यांच्या शेतातील वीज वितरण कंपनीच्या डीपीजवळ उसाची दारे धरण्यासाठी गेली होती. दुपारी २ च्या सुमारास विजय बाळू काळे, विवेकानंद हनुमंत नायकुडे व नितीन रघुनाथ कारंडे हे तिघेजण मोबाईलवर मोठमोठ्याने गाणी लावून शिट्ट्या वाजवत होते म्हणून तिने फोन करून पतीला सांगितले. पती अनिल शेंडे व सासरे रघुनाथ शेंडे यांनी तेथे येऊन त्या तिघांना जाब विचारला.

यावेळी त्यांनी रमेश तामजी कारंडे, दीपक तामजी कारंडे, अजय बाळू काळे, राजेंद्र पांडुरंग बंडगर, बाळासो तायाप्पा काळे, संजय विठ्ठल झरे (रा. महिम) यांना बोलावून गैरकायद्याची मंडळी एकत्रित जमवून महिलेच्या पतीस सासऱ्यास शिवीगाळ करुन मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी मध्येआलेल्या महिलेस विजय काळे, विवेकानंद नायकुडे व नितीन कारंडे यांनी अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. याबाबत नऊ जणांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Three attempted overdose on a woman; Beating husband and father-in-law of six