भालकेंच्या गाडी चालकाला लुटल्याप्रकरणी तिघे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:43+5:302021-01-13T04:54:43+5:30

१० डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास दिवंगत आ. भारत भालके यांच्या कारगाडीचे चालक तुकाराम शिवाजी शिनगारे (वय ३८) हे ...

Three arrested for robbing Bhalke's driver | भालकेंच्या गाडी चालकाला लुटल्याप्रकरणी तिघे पोलिसांच्या ताब्यात

भालकेंच्या गाडी चालकाला लुटल्याप्रकरणी तिघे पोलिसांच्या ताब्यात

१० डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास दिवंगत आ. भारत भालके यांच्या कारगाडीचे चालक तुकाराम शिवाजी शिनगारे (वय ३८) हे बडवेचर झोपडपट्टी येथून चालत घरी जात होते. यावेळी अज्ञात तिघांनी त्यांना अडवले. यावेळी त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून मोबाइल आणि पैशांचे पाकीट काढून घेतले व अंधाराचा फायदा घेऊन तिघेही पळून गेले.

यानंतर तुकाराम शिनगारे यांनी २४ हजारांचा मोबाइल आणि पॉकेटमधील ३ हजार रुपये असा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. यानंतर पोलीस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख राजेंद्र गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश पवार यांनी तपास केला.

या प्रकरणी मनोज बाळू वाघमारे (वय १९, रा. कालिकादेवी चौक) व बत्तीस खोल्या (संतपेठ, पंढरपूर) येथील अल्पवयीन दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मनोज बाळू वाघमारे याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.

Web Title: Three arrested for robbing Bhalke's driver