घाटणे मारहाणीतील तिघांना अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST2021-05-13T04:23:08+5:302021-05-13T04:23:08+5:30

घाटणे, ता माढा येथे २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास नानासाहेब अरुण कदम ( रा घाटणे, ता माढा) ...

Three arrested for assault; Five days in police custody | घाटणे मारहाणीतील तिघांना अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

घाटणे मारहाणीतील तिघांना अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

घाटणे, ता माढा येथे २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास नानासाहेब अरुण कदम ( रा घाटणे, ता माढा) हे चुलत्याच्या घरी गेले असता शेतीच्या कारणावरून चुलते मोहन निवृत्ती कदम,चुलत भाऊ गणेश मोहन कदम (दोघे रा.घाटणे,ता माढा),भाचे प्रशांत शिवाजी लोंढे,सयाजी शिवाजी लोंढे (दोघे रा म्हैसगाव, ता. माढा) यांनी मिळून त्याला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यांच्यावर कुर्डूवाडी,बार्शी व सोलापूर येथील विविध दवाखान्यात उपचार केले. परंतु ७ मे रोजी त्यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून जखमीचा भाऊ उमेश अरुण कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदला. त्यातील चार फरार आरोपीपैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना माढा न्यायालयात उभे केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या खून प्रकरणाचा छडा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे,पोलीस अंमलदार सागर गवळी,विश्वजित ठोंगे,सर्जेराव कर्चे,दत्ता सोमवाड,चालक ललित शिंदे यांच्या पथकाने लावून कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड हे करीत आहेत.

.................

===Photopath===

120521\fb_img_1620834141447.jpg

===Caption===

मयत नानासाहेब कदम फोटो

Web Title: Three arrested for assault; Five days in police custody