बार्शीत साडेतीन हजारांची देशी-विदेशी दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:53+5:302020-12-30T04:29:53+5:30
बार्शी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत लातूर रोडवरील एका परमिट रूम, बिअर बारचा परवाना नसताना देशी-विदेशी दारूची विक्री होत ...

बार्शीत साडेतीन हजारांची देशी-विदेशी दारू पकडली
बार्शी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत लातूर रोडवरील एका परमिट रूम, बिअर बारचा परवाना नसताना देशी-विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी विविध कंपन्यांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्या हॉटेलच्या काउंटरवर जाऊन तेथील व्यक्तीचे नाव विचारले असता, चंद्रकांत गोविंद पवार (रा. राऊत चाळ, बार्शी) असे सांगितले. त्यास हे हाॅटेल कोणाच्या नावावर आहे, याबाबत विचारणा केली असता त्याने पत्नी विद्या पवार यांच्या नावावर असल्याचे सांगितले.
त्यानंतर पंचांसमक्ष हॉटेलची तपासणी करून विविध कंपन्यांची देशी-विदेशी दारू जप्त केली. शिवाय चंद्रकांत गोविंद पवार, त्यांच्या पत्नी विद्या चंद्रकांत पवार (रा. राऊत चाळ, बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई अर्जुन गोसावी यांच्यासह ननावरे, भोंग, अलाट, लगदिवे यांच्या पथकाने केली.
----------