शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार झाडे अलगद उखडली अन्... नव्या हायवेलगत हळुवारपणे रूजविली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:10 IST

नारायण चव्हाण  सोलापूर : सोलापूर - विजयपूर राष्टÑीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या जोमात सुरू आहे. या कामासाठी जेव्हा भूसंपादन ...

ठळक मुद्देसोलापूर-विजयपूर महामार्गावर पुनर्रोपण ‘जेसीबी’च्या सहाय्याने काम सुरू, उपयुक्त वृक्षांना मिळाले जीवदानराष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सोलापूर शहराला जोडणाºया रस्त्यांची कामे सुरू

नारायण चव्हाण 

सोलापूर : सोलापूर - विजयपूर राष्टÑीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या जोमात सुरू आहे. या कामासाठी जेव्हा भूसंपादन करण्यात आले, तेव्हा मुख्य महामार्ग आणि लगतच्या जमिनीवर झाडे तोडल्याशिवाय महामार्गाच्या विकासाचे काम करणे शक्यच नव्हते; पण प्रकल्प संचालक संजय कदम यांना निसर्गात समतोल राखणारी ही वृक्षसंपदा वाचवायची होती. त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या टीमने महामार्गावरील तीन हजार झाडे अलगद उखडून काढली अन् हळुवारपणे नवीन जागेवर त्यांचे पुनर्रोपण केले.

 राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सोलापूर शहराला जोडणाºया रस्त्यांची कामे सुरू आहेत. सोलापूर-विजयपूर हा १०९ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग त्यापैकी एक आहे. भूसंपादनानंतर केलेल्या सर्वेक्षणात जुन्या मार्गावर अनेक लहान -मोठी झाडे आहेत. ही झाडे वाचविण्यासाठी सामाजिक वनीकरण , वनविभागाच्या अधिकाºयांशी कदम यांनी चर्चा केली, परंतु त्यात फारसे यश येईल का, हाही प्रश्न होताच.

 आतापर्यंत वड , पिंपळ अशा दीर्घायुषी झाडांचे पुनर्रोपण केले जात होते. त्यासाठी विशिष्ट अशी यंत्रसामुग्री आवश्यक असते. खर्चही अधिक होतो . मग इतक्या मोठ्या प्रमाणावर ही झाडे अलगदपणे काढून ती अन्यत्र रोपण करणे जिकरीचे काम होते. यासाठी प्राधिकरणाकडे निधीची तरतूद नव्हती. हा प्रकल्प आराखड्याबाहेरचा मग खर्च करायचा तरी कसा, हा प्रश्न होताच .त्यातही त्यांनी मार्ग काढला.

सोलापूर-पुणे महामार्गावरून जंगली हॉटेलपासून निघालेला हा बायपास रोड हत्तूरजवळ विजयपूर महामार्गाला मिळतो . या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम करताना शक्य तितकी झाडे वाचवण्याचा प्रयत्न कसोशीने करण्यात आला. त्यासाठी ‘आयजेएम’ (इंडिया) या चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीची मदत त्यांनी घेतली. लागणारी यंत्रसामुग्री, मनुष्यबळ वापरले. पाण्याच्या टँकरच्या खर्चाची तरतूद केली आणि या झाडांना जीवदान दिले.

असे केले पुनर्रोपण- रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी दोन्ही बाजूंची झाडे जेसीबीच्या सहाय्याने चोहोबाजूने खड्डा खोदून अलगदपणे उचलण्यात आली. त्यापूर्वी बाजूला सोयीस्कर ठिकाणी झाडासाठी खोल खड्डे खोदून ठेवले होते. त्या खड्ड्यांमध्ये योग्य ती खते टाकली . जेसीबीच्या सहाय्याने उखडलेले ते झाड अलगदपणे नव्या खड्ड्यात लावण्यात आले. त्यामागोमाग पाण्याचा टँकर , मजुरांची टीम यांच्या सहाय्याने झाडांचे रोपण करण्यात येते. जवळपास ३ हजार झाडे वाचवण्याचा हा प्रयत्न आहे.आतापर्यंत बहुतांश झाडांचे यशस्वीपणे रोपण करण्यात आले आहे.

रस्ते बांधणी करताना नेहमीच झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणाचा ºहास होतो. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलतोड टाळली पाहिजे. रस्ते करताना वृक्षारोपण तर करायलाच हवे. जिवंत झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण केल्याने वृक्षराजी टिकते. लावलेली झाडे ७५ टक्के जिवंत राहिली याचेही समाधान आहे.-  संजय कदम, प्रकल्प संचालक , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूऱ

वड ,पिंपळ, कडुनिंबची झाडे- जेसीबीच्या मदतीने मोठा घेर असणारी झाडे उखडून त्यांचे पुनर्रोपण करणे जिकरीचे असते़ त्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करीत मध्यम आणि कमी घेर असणाºया वड , पिंपळ , कडुनिंब , करंज आणि बाभूळ आदी झाडांचा त्यात समावेश आहे . नांदणीच्या माळरानावर असलेली करंज आणि खैराची झाडेदेखील त्यांच्या फांद्या तोडून रांगेने लावण्यात आली आहेत.जंगलाचा लूक जसाच्या तसा राखण्यात त्यांना यश आले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकenvironmentवातावरण