Those women members came to the general meeting and went out positive | मोठी बातमी; जिल्हा परिषद सभेला आलेल्या महिला सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

मोठी बातमी; जिल्हा परिषद सभेला आलेल्या महिला सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा होणार आहे. सभेपुर्वी सभागृहात प्रवेश करणाºया सर्व अधिकारी, सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असतानाच जिल्हा परिषदेच्या एका महिला सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते़ सभेपुर्वी संबंधित अधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. सुरूवातीला विरोधी पक्षनेते बळीराम साठे, भारत शिंदे, आनंद तानवडे आदींची कोरोना चाचणी झाली़ त्या सर्व सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला़ त्यानंतर महिला सदस्याची तपासणी करताना त्या महिला सदस्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्हा परिषदेत मोठा खळबळ उडाली. आता सर्वसाधारण होणार की रद्द होणार याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Those women members came to the general meeting and went out positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.