‘त्या आरोपींना फाशीच हवी’, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 05:49 IST2017-09-20T05:49:17+5:302017-09-20T05:49:20+5:30

वर्ष झाले तरी कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेली नाही. आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली.

'Those accused should be hanged', MP Supriya Sule has made a demand | ‘त्या आरोपींना फाशीच हवी’, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मागणी

‘त्या आरोपींना फाशीच हवी’, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मागणी

पंढरपूर/सांगोला : वर्ष झाले तरी कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेली नाही. आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली.
पंढरपूर आणि सांगोला येथे झालेल्या ‘जागर युवा संवाद’प्रसंगी त्या बोलत होत्या. कोपर्डी प्रकरणात तुम्ही काय केले, या मुलींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘वास्तविक पाहता हा खटला तातडीने चालवून आरोपींना फाशीची शिक्षा होईल असे वाटले होते. काळिमा फासणारी घटना घडून वर्ष उलटून गेले तरी पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.

Web Title: 'Those accused should be hanged', MP Supriya Sule has made a demand