चोरट्यांनी ६८ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:22 IST2021-01-20T04:22:37+5:302021-01-20T04:22:37+5:30

हरिदास महादेव दिघे हे १८ जानेवारी रोजी रात्री १०.३० च्या सुमारास ज्वारीच्या पिकास पाणी देण्यासाठी मोटार चालू करुन ...

Thieves stole Rs 68,500 | चोरट्यांनी ६८ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविला

चोरट्यांनी ६८ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविला

हरिदास महादेव दिघे हे १८ जानेवारी रोजी रात्री १०.३० च्या सुमारास ज्वारीच्या पिकास पाणी देण्यासाठी मोटार चालू करुन घरी परतून पुन्हा ज्वारीच्या पिकाचे दारे मोडायचे असल्याने घराचा दरवाजा पुढे करुन झोपले. मध्यरात्री १.१५ च्या सुमारास घरात कशाचा तरी आवाज आल्याने पत्नी शकुंतला या कोण आहे अशा ओरडल्या. त्यांच्या आवाजाने अज्ञात व्यक्ती घराबाहेर पळून जाताना दिसून आले. पती-पत्नीने त्याचा अंगणापर्यंत पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन सदरची व्यक्ती पळून गेली. त्यांनी लगेच घरात जाऊन पाहिले असता कपाटातील सोने-चांदीचे दागिन्यांसह रोख ८ हजार रूपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत हरिदास दिघे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Thieves stole Rs 68,500