Thieves ransacked four houses in Dhotri overnight; Lampas stole millions | धोत्रीत चोरट्यांचा रात्रभर धुमाकूळ, चार घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

धोत्रीत चोरट्यांचा रात्रभर धुमाकूळ, चार घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

धोत्री येथील मल्लप्पा विठोबा नवले यांच्या घराचे दार तोडून कपाटातील चार तोळे सोने, चांदीचे दागिने, सोन्याची बोरमाळ तसेच मुलगा विजय नवले याच्या कपाटातील दोन लाखांची रोकड चोरट्यानी लंपास केली. याच गावातील शांत कुमार चौगुले यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून पंचवीस हजार रुपये रोख आणि चार तोळे सोने तसेच खंडाप्पा चौगुले यांच्या घरातून तीन लाख ६२ हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

चोरट्यानी याच गावातील अन्य दोन घरांचे दरवाजे उचकटले. त्या घरात काहीच हाती लागले नाही. एकाच रात्री चोरट्यानी धोत्री गावात अक्षरशः धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मल्लप्पा नवले यांनी या घटनेची फिर्याद वळसंग पोलीस ठाण्यात दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस नाईक माने या घटनेचा तपास करीत आहेत.

---

Web Title: Thieves ransacked four houses in Dhotri overnight; Lampas stole millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.