शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याचे नाव बोगस असल्याचे निष्पन्न

By admin | Updated: November 19, 2014 23:23 IST

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल--सोलापूर जिल्ह्यात अनेक गुन्हे असण्याची शक्यता असून

सांगली : येथील शंभर फुटी रस्त्यावरील लक्ष्मी नारायण कॉलनीमध्ये नागरिकांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रहीम वजीर शेख (वय ६०, रा. हिप्परगी, ता. सांगोला) याला आज न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, शेख आपले नाव बोगस सांगत असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी दिली. रहीम शेख हा लक्ष्मी नारायण कॉलनीमध्ये चोरी करीत असताना नागरिकांना रंगेहात पकडले होते. यावेळी उडालेल्या झटापटीत त्याने अभिमन्यू लाडेसह दोघांवर लोखंडी गज व स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला होता. याप्रकरणी त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहीम शेख याने सोलापूर जिल्ह्यात अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शेख हा आपले नाव खोटे सांगत असून, पोलिसांची दिशाभूल करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी दिली. ते म्हणाले की, तपास कामात अडथळा निर्माण्ा करण्यासाठी तो बोगस माहिती देत आहे. त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर त्याचे गुन्हे स्पष्ट होणार आहेत. याबाबत अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)ओळख पटवण्याचे कामरहीम शेख याने सोलापूर जिल्ह्यात अनेक घरफोड्या केल्या असून, तो नेहमी वेगवेगळी नावे वापरत आहे. सांगलीतील घरफोडी प्रकरणीही त्याने आपले नाव बोगस सांगितले आहे. त्याचे ओळखपत्र आणण्यास त्याच्या नातेवाईकांना सांगण्यात आले आहे.