चोरट्याने ६७ हजारांचा मुद्देमाल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:21 IST2021-05-10T04:21:39+5:302021-05-10T04:21:39+5:30
सदाशिव मारुती जानकर हे रात्री जेवण करून कुटुंबासमवेत घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपले होते. पहाटेच्या दरम्यान पत्नी ...

चोरट्याने ६७ हजारांचा मुद्देमाल लांबविला
सदाशिव मारुती जानकर हे रात्री जेवण करून कुटुंबासमवेत घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपले होते. पहाटेच्या दरम्यान पत्नी घरातील आवराआवर करताना घरातील लोखंडी पत्र्याची पेटी दिसली नाही. त्यानंतर घरातील सर्वांनी शोध घेतला असता डाळिंबाच्या बागेत लोखंडी पेटीचे कुलूप तोडून, कपडे बाहेर फेकल्याचे दिसून आले. यावेळी अज्ञात चोरट्याने स्टीलच्या डब्यातील रोख ३३ हजार रुपये, ४ हजारांचे २ ग्रॅम सोन्याचे मणी, १० हजाराची अर्धा तोळ्याची कर्णफुले, ६ हजारांचे ३ ग्रॅमचे कानातील सोन्याचे झुमके, ६ हजार रुपयांचे ३ ग्रॅमचे सोन्याचे बदाम, १० हजारांची अर्धा तोळ्याची सोन्याची बोरमाळ असा ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.
याबाबत सदाशिव जानकर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.