मोबाईलसह रोकड चोरुन चोरटा कंपाऊंडवरुन उडी मारुन पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:00+5:302021-03-26T04:22:00+5:30

यातील फिर्यादी रोहित महेश खेडकर (वय- २३, रा. शिवाजीनगर, बार्शी) हा २२ एप्रिल रोजी पुण्याहून इंजिनियरिंगची परीक्षा देऊन घरी ...

The thief stole cash along with his mobile, jumped out of the compound and fled | मोबाईलसह रोकड चोरुन चोरटा कंपाऊंडवरुन उडी मारुन पळाला

मोबाईलसह रोकड चोरुन चोरटा कंपाऊंडवरुन उडी मारुन पळाला

यातील फिर्यादी रोहित महेश खेडकर (वय- २३, रा. शिवाजीनगर, बार्शी) हा २२ एप्रिल रोजी पुण्याहून इंजिनियरिंगची परीक्षा देऊन घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने जवळ असलेले पैशाचे पाकीट, मोबाईल व सॅक बॅग घराच्या मागील बाजूस असलेल्या टेबलवर ठेऊन बाथरूममध्ये हात धुण्यासाठी गेला. परत येईपर्यंत रोख रक्कमेसह १२ हजाराचे साहित्य चोरून नेले. जाताना कंपाऊंडवरुन उडी मारुन पळाला. या प्रकारानंतर रोहित खेडकर याने गुरुवारी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदला आहे.

यातील फिर्यादी हा शिवाजीनगर येथे शिवाजी महाविद्यालयाच्या मागील बाजूस रहात असून त्यानि त्यदिवशी पुण्याहून आल्यानंतर घराच्या मोकळ्या जागेत हे साहित्य ठेवले होते व हात धुण्यासाठी जाऊन परत येत असताना जागेवर पैशाच्या पाकिटासह वरील साहित्य दिसले नाही शिवाय कंपाउंडवरून एकजण उडी मारून निघून गेल्याचे दिसले . पुढील तपास पोलिस दादा माने करत आहेत.

Web Title: The thief stole cash along with his mobile, jumped out of the compound and fled