शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

गुलबर्ग्यातील चोरट्याने सोलापुरातील मोटारसायकली चोरल्या अन् काटेरी झुडपात लपविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 13:14 IST

पाठलाग करुन एकास अटक : एक लाख ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत हस्तगत; सदर बझार गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

सोलापूर : दुचाकीवरून वेगाने जाणाऱ्या संशयित व्यक्तीचा पाठलाग केला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या दुचाकी काटेरी झुडपात लपवून ठेवल्या होत्या. सदर बझार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सहा दुचाकी हस्तगत केल्या. त्यांची अंदाजे किमत एक लाख ९० हजार इतकी होते.

मोहम्मद इस्माईल रब्बानी (वय ४२, रा. गुलबर्गा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय पांडुरंग उपरे (रा. सदर बझार, सोलापूर) यांनी फिर्याद दिली. दि. १६ ते १७ मार्चच्या दरम्यान उपरे यांची घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने सदर बझार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करीत होते. त्यावेळी महावीर चौकातून संशयित व्यक्ती वेगाने दुचाकीवरून गेली. त्याचा पथकाने पाठलाग केला. त्याला पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडे पथकाने अधिक चौकशी केल्यानंतर त्याने शहरातील विविध भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे संभाजी तलावाच्या परिसरातील काटेरी झुडपात त्याने चोरी केलेल्या दुचाकी ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्या हस्तगत केल्या.

 

यांनी केली कारवाई

^ ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, आश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार ओमप्रकाश मडवळी, अतिक नदाफ, पोलीस नाईक खाजपा आरेनवरु, राहुल आवारे, नितीन गायकवाड, सागर सरतापे, विठ्ठल काळजे, रामा भिंगारे, सचिन गुजरे व अमोल उगले यांनी केली.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारीgulbarga-pcगुलबर्गाThiefचोर