घरात घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेच्या अंंगावरील सोनं लुटलं

By दिपक दुपारगुडे | Updated: June 18, 2023 19:07 IST2023-06-18T19:07:18+5:302023-06-18T19:07:25+5:30

सोलापूर : चाकूचा धाक दाखवत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन व सोन्याची कर्णफुले असा एकूण ७८ ...

They broke into the house and stole the gold from the woman's body at the point of knife | घरात घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेच्या अंंगावरील सोनं लुटलं

घरात घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेच्या अंंगावरील सोनं लुटलं

सोलापूर : चाकूचा धाक दाखवत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन व सोन्याची कर्णफुले असा एकूण ७८ हजारांचा ऐवज नेल्या प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रूपा श्रीनिवास गायकवाड (वय २८, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी) यांनी सलगरवस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १८ जूनच्या पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली.

रूपा गायकवाड व इतर मंडळी घरात झोपली होती. त्यावेळी घराचा दरवाजा वाजल्याने रूपा यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी दोन इसमांनी चाकूचा धाक दाखवत फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी रूपा यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र, सोन्याची चेन व कानातील सोन्याची कर्णफुले काढून घेतली. तसेच, त्यांनी घरातील पैसे कोठे आहेत ते काढून दे असे म्हणत धमकावले.

यावेळी झालेल्या आवाजाने फिर्यादीच्या बहिणीची मुलगी ही जागी झाली होती. त्या इसमाने दीपिका हिला चापट मारून कपाटातील पैसे लवकर घेऊन ये असे म्हणाला. तेव्हा दीपिकाने बेडरूममध्ये जाऊन आरडाओरडा केल्याने दोन्ही इसम ७८ हजारांचा ऐवज बळजबरीने घेऊन गेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक शेख करीत आहेत.

Web Title: They broke into the house and stole the gold from the woman's body at the point of knife