डबे पोहचवणाऱ्या तरुणाचे हॉटेल फोडून चार हजारांच्या रोकडसह साहित्य पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST2021-05-21T04:23:20+5:302021-05-21T04:23:20+5:30
हे छोटे हॉटेल टेंभुर्णीपासून एक किलोमीटर अंतरावर असून, एका गरीब कुटुंबातील सुशिक्षित तरुण चालवत आहे. सध्या तो लोकांना घरपोच ...

डबे पोहचवणाऱ्या तरुणाचे हॉटेल फोडून चार हजारांच्या रोकडसह साहित्य पळवले
हे छोटे हॉटेल टेंभुर्णीपासून एक किलोमीटर अंतरावर असून, एका गरीब कुटुंबातील सुशिक्षित तरुण चालवत आहे. सध्या तो लोकांना घरपोच जेवण देत होता. मंगळवारी सायंकाळी हॉटेल बंद करून तो घरी गेला होता. बुधवारी सकाळी जेव्हा हॉटेल उघडले तेव्हा हॉटेलमधील चार गॅसच्या टाक्या, अनाथ मुलांना देण्यासाठी एका डब्यात साठवलेले सुमारे चार हजार रुपये, एक गॅसची शेगडी व जेवण बनवण्यासाठी ठेवलेले किराणा साहित्य याची चोरी झाल्याचे लक्षात आले.
सदर घटनेची तक्रार हॉटेल चालक इरफान रशीद हिरापुरे याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे. ही चोरी झाल्यामुळे इरफान हिरापुरे याच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच तो ज्यांना जेवणाचे डबे पोहचवत होता, त्यांचीही अडचण निर्माण झाली आहे.
----