पुरी येथे कृषी दुकान फोडून सोयाबीनच्या ३२ गोण्या चोरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST2021-06-04T04:18:04+5:302021-06-04T04:18:04+5:30

याबाबत दुकानचे मालक अमर तानाजी झालटे (वय २९ रा. पुरी) यांनी पांगरी पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी अज्ञात ...

They broke into an agricultural shop in Puri and stole 32 bags of soybeans | पुरी येथे कृषी दुकान फोडून सोयाबीनच्या ३२ गोण्या चोरल्या

पुरी येथे कृषी दुकान फोडून सोयाबीनच्या ३२ गोण्या चोरल्या

याबाबत दुकानचे मालक अमर तानाजी झालटे (वय २९ रा. पुरी) यांनी पांगरी पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३८०, ४६१ कलमानुसार गुन्हा नोंदला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २ जून रोजी फिर्यादी व्यवहार उरकून दुपारी दुकान बंद करून गेले होते. ३ जून रोजी सकाळी ते दुकान उघडण्यास आले असता त्याना तीनपैकी एक शटर्सचे कुलूप अर्धवट उघडलेले दिसले. त्यामुळे त्यांनी गावातील नातेवाइकांना व पांगरी पोलिसांना बोलावून घेऊन माहिती दिली. दुकानात जाऊन पहाणी केली असता काउंटरमधील अडीच हजार रुपये, विविध कंपनीच्या १ लाख ५९ हजारांच्या सोयाबीनच्या ३२ गोण्या, तर फॅब्रिकेशनसाठी लागणारे ८ हजार ५०० रुपयांचे साहित्य असा १ लाख ६७ हजाराचा ऐवज चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास पांगरी फौजदार प्रवीण सिरसट करत आहेत.

-----

Web Title: They broke into an agricultural shop in Puri and stole 32 bags of soybeans