खोबरे तिकडे नाही बरे!
By Admin | Updated: August 5, 2014 23:39 IST2014-08-05T21:33:02+5:302014-08-05T23:39:40+5:30
सातारा बाजारपेठ : वर्षभरात दर चौपट,

खोबरे तिकडे नाही बरे!
सातारा : महागाईच्या दरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल मे महिन्यापर्यंत साठ रूपये किलो असणारे खोबऱ्याच्या दरात तब्बल चौपट वाढ झाली आहे. बाजारपेठेत खोबऱ्याची आवक कमी असल्याने हे दरवाढ झाली असल्याचा कयास व्यापारी लावत आहेत. साताऱ्याच्या बाजारपेठेत केरळ आणि कर्नाटक या दोन भागांतून मोठ्या प्रमाणावर सुक्या खोबऱ्याची आवक होते. महिन्यातून किमान दोनदा ट्रकद्वारे वाहतुकीने हे खोबरे बाजारपेठेत दाखल होते. पण गेल्या काही दिवसांत धुवाँधार पावसामुळे ट्रक साताऱ्यात येण्यास उशीर होत असल्यामुळे बाजारपेठेत याचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.सुक्या खोबऱ्या प्रमाणेच नारळानेही पंधरा रूपयांचा दर गाठला आहे. याबरोबरचं मसाल्यातील ... या वस्तुंचे दर चांगलेच वाढले आहेत. श्रावण महिन्यात मांसाहार बंद असल्यामुळे खोबऱ्याचा स्वयंपाकघरातील वापर कमी असतो. पण दुसरीकडे शरिराचे तापमान टिकविण्यासाठी आवश्यक असणारे पौष्टिक डिंकाचे लाडु, पावसाळ्यात मुलांना आवडतो तो चिवडा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोबऱ्याचा वापर होतो. रोजच्या स्वयंपकातही लसुण खोबरे यांची गट्टी असते. पण वाढत्या दरामुळे खोबऱ्याचे स्वयंपाकघरातील अस्तित्व मर्यादित झाले आहे. पोहे, उपीट, आंबट वडी, थापी वडी, वडी सजुरी हे काही पदार्थ केल्यानंतर त्याच्यावर सजावटीसाठी वापरण्यात येणारे खोबरे आता नैवेद्यासारखे वापरले जात असल्याचे चित्र दिसत आहे. भविष्यात हे दर असेच राहिले तर बिनफोडणीच्या वरणाप्रमाणेच बिनफोडणीची आमटी खाण्याची वेळ सामान्यांवर येणार आहे. पावसाळ्यानंतर दर कमी होण्याचा अंदाज आहे. पण हे दर अगदी दहा वीस रूपयांनी कमी होतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांत सौदा बाजारपेठेत खोबऱ्याबरोबरच सुपारी आणि मेथ्यांचाही भाव वाढला आहे. १८० रूपये किलो दराची सुपारी आता साडे तीनशे रूपयांपर्यंत पोहोचली आहे. तर चाळीस रूपये किलो दराची मेथी तब्बल ऐंशी रूपयांपर्यंत गेली आहे. बाजारपेठेतील महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे.
गेल्या काही दिवसांत सौदा बाजारपेठेत खोबऱ्याबरोबरच सुपारी आणि मेथ्यांचाही भाव वाढला आहे. १८० रूपये किलो दराची सुपारी आता साडे तीनशे रूपयांपर्यंत पोहोचली आहे. तर चाळीस रूपये किलो दराची मेथी तब्बल ऐंशी रूपयांपर्यंत गेली आहे. बाजारपेठेतील महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे.