शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

ठेंगीलवाडी, खांडेकर वस्ती, गावडेवाडी, येळेगाव, पांगलेवाडी गावे केली सील

By appasaheb.patil | Updated: April 9, 2020 21:26 IST

सोलापुरात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही; 194 पैकी 140 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 53 जणांचे अहवाल येणे बाकी...

ठळक मुद्देआत्तापर्यंत 194 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील 140 जणांचे अहवाल निगेटिव्हअजुन 54 जणांचे अहवाल येणार आहेत. यात जवळपास 44 व्यक्ती या वांगी आणि परिसरातील आहेत.

सोलापूरसोलापूर जिल्ह्यात आज आज 9 एप्रिल सायंकाळपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण नाही ,अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी नजीकच्या ठेंगीलवाडी येथील एक व्यक्ती ग्वाल्हेर येथे गेल्यानंतर कोरोना बाधित पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने

ठेंगीलवाडी कांबळवाडी, खांडेकर वस्ती, गावडेवाडी, येळेगाव, पांगलेवाडी ही गावं बंदिस्त केली आहेत. या भागात 3334 लोकसंख्या असून 611 घर आहेत. या सर्व व्यक्ती आणि घरांची तपासणी करण्यात आली असून येते 14 दिवस या गावातील प्रत्येक व्यक्तीची  रोज आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. येथे आता कोणाला जाता येणार नाही किंवा येथून कोणाला बाहेरही पडता येणार नाही. ज्या 46 व्यक्तींचा त्या रुग्णाशी थेट संपर्क आला आहे, या सर्वांना  आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. त्यांची  कोरोना चाचणी घेण्यात येत असून त्याचे अहवालही लवकरच प्राप्त होतील.

सिव्हिल हॉस्पिटल मधील आयसोलेशन विभागात आत्तापर्यंत 194 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील 140 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजुन 54 जणांचे अहवाल येणार आहेत. यात जवळपास 44 व्यक्ती या वांगी आणि परिसरातील आहेत.

 बँकांपुढे वाढणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासन बँकांच्या वेळात बदल करण्याचा विचार करत आहे .सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत बँका उघड्या ठेवण्यास संबंधि जिल्हाधिकाऱ्यांनी बँक व्यवस्थापनाची चर्चा केली आहे. तसेच बँकांना समोरील गर्दी टाळावी. उभे राहणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याची सुविधा करावी असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून काऊंटर वाढवावेत असंही सांगितलं आहे.

सोलापूर पोलीस आयुक्तांनी शहराच्या सर्व आठही नाक्यांवर आजपासून पोलीस तैनात केले असून बॉर्डर सीलिंग केली आहे . आता फक्त पासधारी तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारे, शासकीय कर्मचारी तसेच गंभीर स्वरूपाचे रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

आज पासून सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाला मास्क किंवा रुमाल तोंडाला लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

संचारबंदी लॉक डाऊन सुरू असतानाही शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालक तसेच नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची  कारवाई आजही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आत्तापर्यंत  2050 दुचाकी वाहन शहरात जप्त करण्यात आली आहेत.

सोलापूरचे आजचे तापमान09 एप्रिल 2020से.ग्रे.    फँरनाईट कमाल   तापमान40.1   104.2किमान   तापमान23.0    73.4आर्द्रता   18 %पाऊस  0

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य