‘कंम्पलेट कायकू करता’ म्हणत जमावाकडून तरुणाची धुलाई
By विलास जळकोटकर | Updated: May 29, 2023 17:28 IST2023-05-29T17:25:49+5:302023-05-29T17:28:28+5:30
दुचाकी पुढे नेऊन फोनवरून पोलिसांना सांगता असताना पाठलाग करून गाठले व पोलिसात तक्रार देतो काय म्हणून लोखंडी गजाने बेदम मारहाण केली.

‘कंम्पलेट कायकू करता’ म्हणत जमावाकडून तरुणाची धुलाई
सोलापूर : पोलास ठाण्यामे कंम्पलेट कायकु करता असे म्हणत सहा जणांच्या जमावाने रस्त्यावर अडवून लोखंडी गजाने बेदम मारहाण करून जखमी केले. यामध्ये एजाज मकदूम पिरजादे (वय- ३८, रा. समाधान नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) हा जखमी झाला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
यातील फिर्यादी एजाज पिरजादे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हा दुचाकीवरून बुधवार बझारकडे निघाला होता. वाटेत रमजान बागवान, आसिफ बागवान, राहुल पाटील, लखन चव्हाण अडवण्याचा प्रयत्न केला. दुचाकी पुढे नेऊन फोनवरून पोलिसांना सांगता असताना पाठलाग करून गाठले व पोलिसात तक्रार देतो काय म्हणून लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. यावरून वरील सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.