अबब! बायको माहेरी गेली अन नवऱ्यानं केलं दुसरं लग्न! पतीसह चारजणांवर गुन्हा

By रवींद्र देशमुख | Updated: September 15, 2023 18:05 IST2023-09-15T18:04:28+5:302023-09-15T18:05:02+5:30

लग्नानंतर सासरकडील लोकांनी लग्नामध्ये मानपान केला नाही, तसेच जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, म्हणून मारहाण करून त्रास दिला.

The wife left home and the husband got married again! Crime against four persons including husband solapur | अबब! बायको माहेरी गेली अन नवऱ्यानं केलं दुसरं लग्न! पतीसह चारजणांवर गुन्हा

अबब! बायको माहेरी गेली अन नवऱ्यानं केलं दुसरं लग्न! पतीसह चारजणांवर गुन्हा

सोलापूर/मंगळवेढा : नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी आल्यानंतर, पतीने दुसरे लग्न केल्याची तक्रार पत्नीने मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत प्रियंका पडोळे (रा.साळमाळगेवाडी, ता.मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली आहे.

यानुसार, प्रदीप पडोळे, अर्चना पडोळे, बाळासो पडोळे, प्रतीक्षा पडोळे (चौघे रा.साळमाळगेवाडी, ता.मंगळवेढा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका पडोळे यांच्या फिर्यादीनुसार, प्रियंका आणि प्रदीप यांचे लग्न १७ डिसेंबर २०२० मध्ये झाले होते.

लग्नानंतर सासरकडील लोकांनी लग्नामध्ये मानपान केला नाही, तसेच जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, म्हणून मारहाण करून त्रास दिला. या कंटाळून माहेरी आल्यानंतर पतीने संमतीशिवाय दुसरे लग्न केल्याची फिर्याद प्रियंका पडोळे यांनी दिली आहे. यानुसार, चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: The wife left home and the husband got married again! Crime against four persons including husband solapur

टॅग्स :marriageलग्न