सोलापूर : एमआयएमचा जनाधार दिवसेंदिवस ढासळत असून, मुस्लिम मतदार राष्ट्रवादीकडे वळत असल्याने एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी वैफल्यग्रस्त झाले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी (अजित पवार) चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली. कोणाचा खिसा मोठा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे म्हणत त्यांनी ओवैसींवर जोरदार पलटवार केला. सोलापुरात शुक्रवारी एका खासगी हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्ष संध्याराणी सोनवणे, शहर व जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) चा जाहीरनामा शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. यावेळी डावीकडून आनंद मुस्तारे, प्रा. श्रीनिवास कोंडी, उमेश पाटील, संतोष पवार, हेमंत चौधरी, तटकरे, दत्तात्रेय भरणे, रूपाली चाकणकर, मकबूल मोहोळकर आदी.
जुबेर बागवान, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, तौफिक शेख, चंद्रकांत दायमा, प्रमोद भोसले, चित्रा कदम, प्रा. श्रीनिवास कोंडी, भास्कर आडकी, सुहास कदम आदी उपस्थित होते. यावेळी सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.
परळीतील युती थांबविण्याच्या सूचना
परळी नगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी एमआयएम व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या युतीबाबत विचारले असता तटकरे म्हणाले, आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत. त्यामुळे एमआयएमशी युती करणे आमच्या विचारसरणीला छेद देणारे आहे. परळीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांना ही युती तत्काळ थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Sunil Tatkare criticized Owaisi, stating MIM's support is declining as Muslims favor NCP. He emphasized Maharashtra knows who is wealthier. Tatkare instructed dissolving the Parli alliance with MIM due to ideological differences, upholding secular principles.
Web Summary : सुनील तटकरे ने ओवैसी की आलोचना करते हुए कहा कि मुस्लिम मतदाता एनसीपी को पसंद कर रहे हैं, इसलिए एमआईएम का समर्थन घट रहा है। उन्होंने जोर देकर कहा कि महाराष्ट्र जानता है कि कौन अधिक धनी है। तटकरे ने धर्मनिरपेक्ष सिद्धांतों को बनाए रखते हुए, वैचारिक मतभेदों के कारण एमआईएम के साथ परली गठबंधन को भंग करने का निर्देश दिया।