शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या आणखी एका पदाधिकाऱ्याविरुद्ध सोलापुरातील पीडितेची महिला आयोगाकडे धाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 22:12 IST

सोलापुरातील महिलेने ६ मे २०२२ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती.

- राकेश कदम

सोलापूर :  भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे बेडरुममधील व्हिडिओ प्रकरण ताजे आहे. यातच आता सोलापुरातील एका महिलेने भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रार प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी राज्य महिला आयोगाकडे रविवारी केली आहे. 

सोलापुरातील महिलेने ६ मे २०२२ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटले होते की, माझा २०११ मध्ये अलिबाग जि. रायगड येथील एका व्यक्तीशी विवाह झाला होता. काही वर्षातच घटस्फोट झाला. यानंतर माझी एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत मैत्री झाली. 

आमच्या अनेक भेटींमध्ये त्यांनी त्यांचा घटस्फोट झाल्याचे दाखविले. त्यामुळे त्यांच्यासोबत मी ६ ऑक्टोबर २०१५ रोजी नवी मुंबईतील गावदेवी मंदिरात विवाह केला. यानंतर त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. माझ्यावर अत्याचार झाला. माझा व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकीही दिली. मला व माझ्या कुटुंबीयांना त्यांच्याकडून धोका असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले होते. 

या महिलेने राज्य महिला आयोगाकडे एप्रिल महिन्यात तक्रार केली होती. दरम्यान, श्रीकांत देशमुख यांचे प्रकरण समोर आल्यानंतर या महिलेने रविवारी पुन्हा महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आपल्याला न्याय मिळावा. रायगड आणि सोलापूर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारींबाबत काय झाले याबद्दल कळवावे अशी मागणी केली आहे.

रायगड पोलिसांना स्मरणपत्र देणार!सोलापुरातील महिलेची तक्रार आमच्यापर्यंत आली होती. या प्रकरणात काय कारवाई केली याबद्दल अहवाल सादर करावा, असे पत्र राज्य महिला आयोगाकडे रायगड पोलिसांना दिले होते. सोमवारी पुन्हा स्मरणपत्र देऊन अहवाल मागवून घेणार आहोत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी