शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पळून गेलेल्या ‘त्या’ तिघी नाशिकमधून ताब्यात; मुलींसह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल नातलगांकडे सुपूर्द 

By विलास जळकोटकर | Updated: September 30, 2023 20:03 IST

मुलींसह मुद्देमाल नातलगांकडे सुपूर्द करण्यात आला. २४ तासांत तपास लागल्याने वाम मार्गाला लागण्यापासून त्यांची मुक्तता झाली.

सोलापूर : दोन मुली आणि एक पुतणी अशा तीन मुली घरातून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली अन् तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यात आली. जाताना त्यांनी रोख रक्कम आणि दागिने नेले होते. २४ तासांत या गुन्ह्याचा तपास लावून या मुलींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील साडेसात लाखांची रोकड आणि तीन लाखांचे दागिने जप्त केले. मुलींसह मुद्देमाल नातलगांकडे सुपूर्द करण्यात आला. २४ तासांत तपास लागल्याने वाम मार्गाला लागण्यापासून त्यांची मुक्तता झाली.

शहरापासून जवळच असलेल्या एका गावात किराणा दुकान चालवून एकत्र कुटुंब वास्तव्यास होते. २७ सप्टेंबर रोजी यातील तक्रारदार महिलेची एक १८ वर्षाची सज्ञान, दुसरी १३ वर्षाची आणि दिराची १३ वर्षाची मुलगी अशा तिघी मुली २७ सप्टेंबर रोजी घरात साप निघाल्याचा बहाणा करुन दरवाजाला कडी लावून पळून गेल्या होत्या. जाताना त्यांनी लाखोंची रोकड आणि दागिने नेले होते. तातडीने मुलीची आईने सलगर वस्ती ठाण्यात कोणीतरी फूस लावून तिघींना पळवून नेल्याची तक्रार नोंदवली होती.

यात पळून गेलेल्या मुलींपैकी दोघी अल्पवतीन आहेत. घटनेची गांभीर्य ओळखून सलगरवस्ती पोलिसांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने वेगाने तपासाची चक्रे फिरवली. संशयित इसम आणि गावातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला. त्या नाशिक येथे असल्याचे समजले. पोलिसांनी नाशिक युनिट २ येथील पोलीस अंमलदाराची मदत घेऊन त्या मुलींचा शोध घेतला असता त्या औदुंबर स्टॉप सिडको अंबड येथे आढळल्या. त्यांना तेथून ताब्यात घेतले. अंबड पोलीस ठाण्यात नेऊन रोख रक्कम व दागिन्याबद्दल चौकशी केली. त्यांच्याकडून ७ लाख ५० हजार रोख रक्कम आणि अंदाजे तीन लाखांचे दागिने जप्त केले. पथकाने सोलापुरात आल्यानंतर मुलींसह वरील ऐवज त्यांच्या ताब्यात देण्यात आला.ही कारवाई फौजदार सचिन मंद्रूपकर, हवालदार बालाजी पोतदार, अय्याज बागलकोटे, अविनाश डिगोळे, बाबुराव क्षीरसागर, मैना घुमरे यांनी यशस्वी केली.

अन् यंत्रणा कामाला लागलीपळून गेलेल्या तिन्ही मुलींपैकी दोघी अल्पवयीन असल्याने आणि त्यांच्याजवळ लाखों रुपये आणि दागिने असल्याने पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा कामाला लागली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी तांत्रिक मदतीच्या सहाय्याने वेळीच दक्षता घेतल्याने तिघी मुली आणि मुद्देमाल हाती लागला. 

टॅग्स :PoliceपोलिसSolapurसोलापूरMONEYपैसाGoldसोनं