पोलिसाच्या गाडीलाच पाठीमागून धडक : दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
By प्रताप राठोड | Updated: March 25, 2023 17:31 IST2023-03-25T17:30:51+5:302023-03-25T17:31:14+5:30
याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसाच्या गाडीलाच पाठीमागून धडक : दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
सोलापूर : जेऊर - करमाळा रस्त्यावर झरे येथील बिले पेट्रोलपंपाजवळ रात्रीची गस्त घालणा-या करमाळा पोलिसांच्या गाडीला पाठीमागून एका मोटारसायकलने धडक दिली. याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला आहे.
शिवाजी तुकाराम जाधव (वय ३०, रा. चिखलठाण ता.करमाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. पोलिस नाईक कल्याण फरतडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांची रात्रीची गस्त सुरु असताना शिवाजी जाधव यांच्या मोटारसायकलीने पोलिसांच्या गाडीला मागून धडक दिली.
यामध्ये मोटारसायकल स्वार शिवाजी जाधव हे जखमी झाले असून त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. शिवाजी जाधव स्वतःच अपघातास जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.