आँक्सिजन प्लांटचा पाईप पळविला; रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 13, 2023 15:01 IST2023-08-13T15:00:53+5:302023-08-13T15:01:11+5:30

याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

The pipe of the oxygen plant ran; | आँक्सिजन प्लांटचा पाईप पळविला; रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली

आँक्सिजन प्लांटचा पाईप पळविला; रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली

सोलापूर : करमाळा उपजिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन प्लांट ते रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणारा पाईप चोरट्याने पळवला. याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या प्रकरणी रुग्णालयाचे कनिष्ठ लिपीक सुरेश आगलावे (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. चोरी झालेल्या कॉपरच्या पाइपची किंमत साधणार २७०० रुपये असून पहाटे ही चोरी झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गजानन गुंजकर यांच्या कक्षात असलेल्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. चोरट्याने हिसका मारून हा पाईप चोरून नेताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Web Title: The pipe of the oxygen plant ran;