शरद पवार गटाने काढलेला फोटो अजितदादा गटाने वाजत गाजत आणून लावला

By राकेश कदम | Updated: July 17, 2023 14:29 IST2023-07-17T14:29:31+5:302023-07-17T14:29:42+5:30

अजित पवार गटाचे कार्यकर्ते सोमवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादीच्या रेल्वे लाईन येथील कार्यालयात पोहोचले.

The photo taken by the Sharad Pawar group was brought by the Ajit Pawar group | शरद पवार गटाने काढलेला फोटो अजितदादा गटाने वाजत गाजत आणून लावला

शरद पवार गटाने काढलेला फोटो अजितदादा गटाने वाजत गाजत आणून लावला

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयातून अजितदादांचा फोटो काढूला होता. हा फोटो अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी ताब्यात घेतला. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संतोष पवार यांच्या कार्यालयात वाजत गाजत आणून लावला.

अजित पवार गटाचे कार्यकर्ते सोमवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादीच्या रेल्वे लाईन येथील कार्यालयात पोहोचले. शरद पवार आमचे गॉडफादर आहेत तर अजित दादा आमचे 'हार्टबीट' आहे. आमच्या नेत्याचा फोटो परत द्या अशी मागणी शहराध्यक्ष भारत जाधव यांच्याकडे करण्यात आली.‌ 

हा फोटो घेऊन कार्यकर्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संतोष पवार यांच्या कार्यालयात आले. या कार्यालयातच अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला. युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, महेश निकंबे, आनंद मुस्तारे, लता ढेरे, अमीर शेख उपस्थित होते.

Web Title: The photo taken by the Sharad Pawar group was brought by the Ajit Pawar group