शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

रिकाम्या हाताला दिलं रोजगाराचं साधन, सोलापुरातील श्रमधारी गरजूंच्या आनंदाला उधाण

By appasaheb.patil | Updated: March 9, 2023 16:38 IST

सध्या शहरात बेरोजगारांची संख्या अधिक आहे.

सोलापूर : उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळेना..उद्योग करण्यासाठी पैसा जवळ नाही..अशा एक ना अनेक विवंचनेत असलेल्या शेकडो गरजू लोकांना रेहबर फाउंडेशन आणि सफा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शहरातील शेकडो गरजवंतांना रोजगाराचे साधन मोफत देण्यात आले. या अनोख्या भेटीनं श्रमधारी गरजूंच्या आनंदाला उधाण आलं होतं.

सध्या शहरात बेरोजगारांची संख्या अधिक आहे. जो तो रोजगाराच्या शोधात दारोदार फिरत आहे. अशातच महागाईने त्रस्त झालेली जनता अगदीच निराश होवून जगत असताना रेहबर फाउंडेशन आणि  सफा वेलफेअर ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांनी तनंजिम हमदर्द इन्सानियत संस्थेच्या मार्गदर्शनाखली सोलापुरातील शेकडो सर्वधर्मिय गरजू लोकांना रोजगार उपलब्ध व्हावे म्हणून त्यांना चार चाकी गाडीसह रोजगाराचे साहित्य मोफत वाटप करण्यात आले.  यावेळी जमियते उलमाचे मौलाना इब्राहीम साहब,  ॲड. आसीम बांगी,  हैदराबाद, बेंगलोरचे धर्मगुरू उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तनंजीमचे जिल्हाध्यक्ष हाफिझ मेहबूब नदाफ,  मौलाना रमजान, फारुख शेख, हाफिझ अमन, आसिफ बागबान खलिफा, रईस शेख, सोहेलभाई, मोहयोद्दीन भाई, आसीमभाई , मोईनुद्दीन, साहिल, पटेल, मुजम्मिल, मोहम्मद अली, शकील भाई व अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.

लाखो रूपयांचा खर्च

गरजू लोकांना देण्यात आलेली एका हातगाडीची किंमत कमीत कमी २० हजारच्या आसपास असून असे एकूण १० ते २० लाख रूपये खर्चकरून या गाड्या बेरोजगारांना दिल्या. संस्थेने समाजातील गरजू लोकांचे सर्वेक्षण करून हे सर्व साहित्य वाटप केल्याचे सांगितले. प्लास्टिक साहित्य, फ्रुट, व्हेजिटेबल व्यवसाय करण्यासाठी  गाडी सोबत पूर्ण वस्तू मोफत देण्यात आले.

समाजामध्ये भाईचारा, अमन, शांती प्रेम,  राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.  भविष्यात आणखीन नवनवीन उपक्रम सामाजिक हितासाठी राबविण्यात येणार आहेत.

- हाफिझ मेहबूब नदाफ, जिल्हाअध्यक्ष, तनंजीम

टॅग्स :Solapurसोलापूर