आयकर विभागाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांची केली चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 14:12 IST2022-08-26T14:12:04+5:302022-08-26T14:12:14+5:30
अभिजीत पाटील यांच्या विविध संस्थांची ३२ तासांपासून आयकर विभागाकरून चौकशी सुरू

आयकर विभागाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांची केली चौकशी
पंढरपूर : डी व्ही पी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्या विविध संस्थांची ३२ तासांपासून आयकर विभागाकरून चौकशी सुरू असून या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह अनेक छोट्या मोठ्या नेत्यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे.
गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास अभिजीत पाटील यांचे कारखाने व इतर संस्थांची चौकशी सुरू केली होती. दुसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत. या तपासणी दरम्यान व्यापारी, शेतकरी आणि कारखान्यांच्या संचालकांची चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यामुळे अभिजीत पाटील यांच्या संपर्कात असलेल्या सर्व लोकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.