रॉड तुटल्यानं चारचाकी खड्ड्यात पडून पती-पत्नीसह मुलगा गंभीर जखमी
By विलास जळकोटकर | Updated: September 13, 2023 18:49 IST2023-09-13T18:49:05+5:302023-09-13T18:49:20+5:30
तांदुळवाडी ब्रीजजवळ अपघात : तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार

रॉड तुटल्यानं चारचाकी खड्ड्यात पडून पती-पत्नीसह मुलगा गंभीर जखमी
सोलापूर: सोलापूरकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाचा रॉड तुटल्याने वाहन रोडच्या साईडला खड्ड्यात पडून तिघेजण गंभीर जखमी झाले. बुधवारी सायंकाळी तांदुळवाडी ब्रीजच्या जवळ हा अपघात झाला. धोंडिराम वेणू राठोड (वय- ५५), ललिता राठोड व अजय धोंडिराम राठोड (रा. चापळा तांडा, ता. तुळज़ापूर) अशी जखमी पती-पत्नी व मुलाची नावे आहेत.
यातील जखमी धोंडिराम राठोड हे एम. एच. २५ उ २५६६ या चारचाकी वाहनातून चापळा तांड्याहून सोलापूरकडे येत होते. तांदुळवाडी ब्रीज पार करुन वाहन काही अंतरावर आले असताना अचानक वाहनाचा रॉड तुटला. यामुळे वाहनावरचा ताबा सुटून ते साईडच्या खड्ड्यात पडले. यात वरील तिघेजण जखमी झाले.
अपघाताचे वृत्त समजताच रुग्णवाहिकेद्वारे जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये जखमी धोंडिराम यांच्या छातीस, डोक्याला मार लागला. तर ललिता यांच्याही डोक्यासह सर्वांगास खरचटले आहे.दहा वर्षाचा मुलगा अजय याला उलट्याचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. तिघेही जखमी शुद्धीवर असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.