मुंबई - उत्तर भारतातील थंड, कोरडे, उत्तरी वारे थेट सोलापूरपर्यंत झेपावल्यामुळे सोमवारी जेऊर (ता. करमाळा) येथे रविवारपेक्षा किमान तापमान घट होऊन अतितीव्र थंडीची लाट जाणवली. सोमवारी तेथील किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घटले. हे तापमान सरासरीच्या १४ अंश सेल्सिअसने खाली आहे. तर मुंबईचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, उन्हाचा तडाखा तुलनेने कमी झाला आहे. रात्री आणि पहाटेच्या हवेत गारवा आल्याने मुंबईला किंचित का होईना दिलासा मिळाला.
जळगावला पुन्हा रविवारपेक्षा तापमानात घसरण होऊन ९.४ अंश इतके किमान तापमान नोंदवले गेले. ते सरासरीच्या ६.४ अंशांनी खाली आहे. त्यामुळे तेथे थंडीची लाट अनुभवली गेली. जळगावचे कमाल तापमानही २९.८ अंश नोंदवले गेले. ते सरासरीच्या ३.७ अंशने कमी झाले आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, अहिल्यानगर, छ.संभाजी नगर, बीड, डहाणू, नाशिक, नंदुरबार, नांदेड, सांगली या शहरांबरोबरच विदर्भातील शहरात थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.
तीन दिवसांत पारा घसरेलबुधवारपर्यंतच्या तीन दिवसात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, डहाणू व छ. संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी तसेच संपूर्ण विदर्भात किमान तापमानाचा पारा घसरणार आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Web Summary : Cold northern winds from North India brought a severe cold wave to Solapur, with Jeur recording 9°C. Jalgaon also experienced a cold wave at 9.4°C. Several other cities across Maharashtra and Vidarbha are experiencing similar cold conditions.
Web Summary : उत्तर भारत से ठंडी हवाओं के कारण सोलापुर में शीतलहर, जेउर में 9 डिग्री सेल्सियस तापमान दर्ज किया गया। जलगाँव में भी 9.4 डिग्री सेल्सियस के साथ शीतलहर का अनुभव हुआ। महाराष्ट्र और विदर्भ के कई शहरों में ठंड की स्थिति बनी हुई है।