बिहारमधून मुलीला घेऊन पळून आलेल्या मुलास पोलिसांनी पकडले
By दिपक दुपारगुडे | Updated: October 4, 2023 19:19 IST2023-10-04T19:19:10+5:302023-10-04T19:19:27+5:30
सोलापूर : बिहार राज्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणलेल्या आरोपीस अल्पवयीन मुलीसह माढा पोलिसांच्या मदतीने बिहार पोलिसांच्या ...

बिहारमधून मुलीला घेऊन पळून आलेल्या मुलास पोलिसांनी पकडले
सोलापूर: बिहार राज्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणलेल्या आरोपीस अल्पवयीन मुलीसह माढा पोलिसांच्या मदतीने बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबतीत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बिहार राज्यातील सहरसा जिल्ह्यातील नवहट्टा तालुक्यातील महीसा पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयिताला शोधण्यासाठी बिहारचे पोलिस निरीक्षक इंदलकुमार गुप्ता, पोलिस काॅन्स्टेबल रांजेश राज, महिला पोलिस काॅन्स्टेबल रिचा भारती हे १ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले. यावेळेस त्यांनी वैराग परिसरात बिहार मजूर असणाऱ्या ठिकाणांचा शोध घेतला. मात्र त्या ठिकाणी अपयश आल्यावर माढा पोलिसांच्या मदतीने माहिती घेतल्यानंतर यातील संशयित मुलगा शेतामध्ये मिळेल त्या ठिकाणी कामावर जात असल्याची माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक भगवान खणदाळे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र भापकर, पोलिस नाईक संदीप निचळ, पोलिस नाईक सरस्वती लोकरे यांच्या मदतीने कारवाई केली व बिहार पोलिसांना पीडित मुलीला व संशयित आरोपीस पोलिसांकडून ताब्यात देण्यात आले.