पाण्यात तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह
By रूपेश हेळवे | Updated: February 23, 2023 17:23 IST2023-02-23T17:22:44+5:302023-02-23T17:23:32+5:30
ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.

प्रतिकात्मक फोटो
सोलापूर : सिध्देश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या गणपती विसर्जन कूंडातील पाण्यात तरुण तरंगताना आढळला. सागर गिरीश कोरूड ( वय २८, रा. गणेश पेठ सोलापूर) असे त्या तरूणाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.
गुरूवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक तरूण पाण्यात तरंगताना आढळला. ही माहिती फौजदार चावडी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या तरुणाला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे..