नाट्यपरिषेदच्या निवडणुकीसाठी सोलापुरातून दहाजण रिंगणात
By रवींद्र देशमुख | Updated: March 17, 2023 18:01 IST2023-03-17T18:01:21+5:302023-03-17T18:01:35+5:30
१६ एप्रिल रोजी होणार मतदान

नाट्यपरिषेदच्या निवडणुकीसाठी सोलापुरातून दहाजण रिंगणात
रवींद्र देशमुख/सोलापूर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोलापुरातून दहा रंगकर्मी रिंगणात असून, १६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
ज्येष्ठ नेपथ्यकार गुरू वठारे आणि सहकाऱ्यांनी रंगभूमी पॅनल गठित केले असून, यामधून वठारे यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक डॉ. मीरा शेंडगे, रंगकर्मी अनुजा मोडक, ॲड. अरविंद अंदोरे यांचा समावेश आहे. या पॅनलची ज्येष्ठ निर्माते आणि रंगकर्मी विजयकुमार साळुंके यांच्या नटराज पॅनलशी लढत होणार आहे. यामध्ये साळुंके यांच्यासह रंगकर्मी समद फुलमामडी, प्रा. अजय दासरी, विश्वनाथ आवड, तेजस्विनी कदम आणि दिलीप कोरके यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहा नाट्य शाखांचे एकूण २६०० मतदार आहेत. सोलापुरातून ६ उमेदवारांना निवडून द्यायचे आहे.