दहा महिने लोटले.. जिल्ह्यातील गटसचिवांना नाही वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:39+5:302021-02-05T06:44:39+5:30

या संबंधी जिल्हा उपनिबंधक सह. संस्था सोलापूर तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती, सहाय्यक निबंधक सह. संस्था करमाळा, प्रशासक सोलापूर जिल्हा ...

Ten months have passed .. No salary for group secretaries in the district | दहा महिने लोटले.. जिल्ह्यातील गटसचिवांना नाही वेतन

दहा महिने लोटले.. जिल्ह्यातील गटसचिवांना नाही वेतन

या संबंधी जिल्हा उपनिबंधक सह. संस्था सोलापूर तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती, सहाय्यक निबंधक सह. संस्था करमाळा, प्रशासक सोलापूर जिल्हा मध्य सह बँक, अवसायक सोलापूर जिल्हा देखरेख सह संस्था यांना लेखी निवेदन दिले आहे. सोलापूर जिल्हा देखरेख सह संस्थेवर अवसायक नेमून जिल्हास्तरीय समितीकडे कामकाज गेल्यापासून सचिवांचे पगार वारंवार थकत आहेत. पगारविना कामकाज करणे व प्रपंच चालवणे गटसचिवांना मुश्कील झाले आहे. बँकेचे व शासनाचे धोरणाप्रमाणे कर्जमाफी व वसुलीची सातत्याने प्रामाणिकपणे कामे करून देखील केडरवर अवसायक, बँकेवर प्रशासक, जिल्हास्तरीय समितीचे दुर्लक्ष यामध्ये गटसचिव भरडला जात असून सचिवांवर उपासमारीची वेळ आली आहे. संस्थेचे कामकाज करण्यासाठी, वसुलीला जाण्यासाठी पेट्रोलला शे-दोनशे देखील त्यांच्याकडे नाहीत. सादीलचे पाचशे रुपये खर्चाचीदेखील परवानगी नाही. अशा परिस्थितीत सचिवांना काम करणे अवघड झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन व आर्थिक क्रांती घडविणाऱ्या जिल्हा बँकेशी संलग्न वि. का. सोसायट्यांच्या पगारी नियमितपणे होत नाहीत. याबाबत जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी नेते आ. बबनराव शिंदे, आ. संजयमामा शिंदे, आ. प्रशांत परिचारक, माजी आ. राजन पाटील, माजी आ. जयवंतराव जगताप, माजी आ. दिलीपराव माने या बड्या नेतेमंडळींनी सचिवांच्या प्रश्नात लक्ष घालून सचिवांच्या पगारी नियमितपणे होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी गटसचिव मंडळीनी मागणी केली आहे.

Web Title: Ten months have passed .. No salary for group secretaries in the district