शिवसैनिकाच्या खून प्रकरणी टेम्पोचालकाला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:19 IST2021-07-17T04:19:16+5:302021-07-17T04:19:16+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १४ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ -कुरुल रस्त्यावरील पाण्याच्या टाकीसमोर जेवण करून ...

Tempo driver remanded in police custody till July 23 in Shiv Sainik murder case | शिवसैनिकाच्या खून प्रकरणी टेम्पोचालकाला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

शिवसैनिकाच्या खून प्रकरणी टेम्पोचालकाला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १४ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ -कुरुल रस्त्यावरील पाण्याच्या टाकीसमोर जेवण करून (एम. एच. १३ सी. पी. ०६८७) दुचाकीवरून घरी परतत असताना सतीश क्षीरसागर व विजय सरवदे यांच्या दुचाकीला भैय्या असवले याने त्याच्या आयशर टेम्पोने (क्रमांक एम. एच. १३, ए. एक्स. ४९०८) पाठीमागून वेगात आणून धडक दिली. या घटनेत सतीश क्षीरसागर जागीच ठार तर विजय सरवदे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सोलापुरात दवाखान्यात उपचार सुरू आहेत. टेम्पोचालक भैय्या असवले याने मोहोळ पोलिसात येऊन हजर होत माझ्याकडून अपघात झाला असल्याचे सांगितले होते. यानुसार टेम्पो चालक भैय्या असवले याला मोहोळ पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील तीन संशयित आरोपी अद्यापपर्यंत फरार आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर हे करीत आहेत.

Web Title: Tempo driver remanded in police custody till July 23 in Shiv Sainik murder case