टेम्पो, कारसह १९० गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 12:09 PM2021-10-19T12:09:37+5:302021-10-19T12:10:30+5:30

चार जणांना अटक; २६ लाख २० हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल केला जप्त

Tempo, cars, 190 Goa-made illegal liquor stocks seized; Action of Excise Department | टेम्पो, कारसह १९० गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

टेम्पो, कारसह १९० गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Next

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी रात्री उशिरा मोठी कारवाई केली. शेटफळ ते कुर्डवाडी रस्त्यावर असलेल्या शेटफळ चौकालगत एका हॉटेलसमोर उभारलेल्या टेम्पोतील गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा जप्त केला. या कारवाईत टेम्पो, कारसह १९० बॉक्स गोवा बनावटीची अवैध दारूसाठा असा एकूण २६ लाख २० हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

राज्य उत्पादन शुल्कचे राज्य आयुक्त कांतीलाल उमाप, पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, सोलापूरचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभागचे प्र. निरीक्षक अंकुश आवताडे व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सोलापूर चे प्र. निरीक्षक सुदर्शन संकपाळ, दुय्यम निरीक्षक सुनिल पाटील, झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर व जवान आण्णा कर्चे, प्रकाश सावंत, चेतन व्हनगुंटी, नंदकुमार वेळापुरे, किशोर लुंगसे, विकास वडमिले व विजय शेळके यांच्या पथकाने सोमवार १८ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ७.०० ते ०९:३० चे सुमारास शेटफळ ते कुर्डवाडी रस्त्यावर, शेटफळ चौकालगत हॉटेल शिवप्रसाद धाब्यासमोर यशस्वी कारवाई केली.

या कारवाईत विलास मोराळे,  कृष्णा मुजमुले,  गणेश जाधव आणि मिलिंद मगरे यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील एक कार, टेम्पों असे दोन वाहने व गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे एकुण १९० बॉक्स जप्त करून आरोपी विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास प्र.निरीक्षक भरारी पथक सोलापूर सुदर्शन संकपाळ हे करीत आहेत.

 

Web Title: Tempo, cars, 190 Goa-made illegal liquor stocks seized; Action of Excise Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.