वेतन वाढीसाठी तहसीलदारांनी दिला 28 डिसेंबरपासून संपाचा इशारा
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: December 18, 2023 16:38 IST2023-12-18T16:38:07+5:302023-12-18T16:38:56+5:30
कृषी विभागातील तहसीलदार श्रेणीतील अधिकाऱ्यांना ग्रेड पे ४८०० रुपये लागू आहे. तर महसूल विभागातील तहसीलदारांना ग्रेड पे 4300 लागू आहे.

वेतन वाढीसाठी तहसीलदारांनी दिला 28 डिसेंबरपासून संपाचा इशारा
सोलापूर : राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांना ग्रेड पे ४८०० रूपये लागू करण्याची मागणी राज्यभरातील तहसीलदारांनी केली असून यासाठी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर धरणे आंदोलन केले.
कृषी विभागातील तहसीलदार श्रेणीतील अधिकाऱ्यांना ग्रेड पे ४८०० रुपये लागू आहे. तर महसूल विभागातील तहसीलदारांना ग्रेड पे 4300 लागू आहे. दोघांमध्ये समान वेतनश्रेणी असावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून तहसीलदार राज्य सरकारकडे करत आहेत.
लवकरात लवकर ग्रेड पे ४८०० रुपये लागू करण्याची मागणी तहसीलदारांनी केली. अन्यथा २८ डिसेंबर पासून बेमुदत संपाचा इशारा तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने सोमवारी दिला आहे. पुनम गेटवर दोन तास धरणे आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांनी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. यावेळी महसूल विभागातील तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.