मंगळवेढ्यात तहसीलचे कामकाज रोखले; मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला
By दिपक दुपारगुडे | Updated: October 31, 2023 18:05 IST2023-10-31T18:05:31+5:302023-10-31T18:05:43+5:30
सध्यस्थितीत आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. तरी शासन मराठा समाजाचा अंत पाहत आहे.

मंगळवेढ्यात तहसीलचे कामकाज रोखले; मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला
सोलापूर - महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय अतिशय गंभीर बनत चालला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली असताना शासन यावर कोणताही ठोस निर्णय घेत नाही. यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवेढा तहसील कार्यालयतील शासकिय अधिकाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी अटकाव करून आंदोलन करण्यात आले.
सध्यस्थितीत आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. तरी शासन मराठा समाजाचा अंत पाहत आहे. अनेक मराठा बांधव आत्महत्या करीत आहेत. याचा जाब विचारण्यासाठी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला जागे करण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन दिवसभरासाठी तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाज बंद ठेवण्यात आले. दप्तरी नोंद असलेले कुणबी मराठा पुरावा कागदपत्रांची शोध मोहीम त्वरीत हाती घ्यावी, अशी मागणीही समाजाच्या वतीने करण्यात आली.