माणचे शिक्षक राज्याला करणार संगणक साक्षर

By Admin | Updated: August 9, 2014 00:36 IST2014-08-09T00:05:48+5:302014-08-09T00:36:54+5:30

सर्वत्र गाजणार ‘सातारा पॅटर्न’

Teacher teacher to state teacher | माणचे शिक्षक राज्याला करणार संगणक साक्षर

माणचे शिक्षक राज्याला करणार संगणक साक्षर

म्हसवड : ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणे आयोजित महाराष्ट्रातील निवडक प्राथमिक शिक्षकांना अध्यापनात संगणकाचा वापर कसा करावा, यासाठी आणि संगणकाचे ई-लर्निंगचे महाराष्ट्रभर प्रशिक्षण देण्यासाठी माण तालुक्यातील बालाजी जाधव आणि रामभाऊ सालगुडे या दोन प्राथमिक शिक्षकांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवसांची कार्यशाळेचे आयोजन केले असून, त्यामध्ये अध्यापनात संगणकाचा वापर कसा करावा, संगणकाच्या कोणत्या प्रणाली कोणत्या साईटचा वापर करावा, पेपरलेस वर्कसाठी शैक्षणिक बाबीचे महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिक या दोघा शिक्षकांच्या साह्याने घेतले जाणार आहे.
बालाजी जाधव व रामभाऊ सालगुडे या माण तालुक्यातील दोन प्राथमिक शिक्षकांनी कोणतीही संगणकाची पदवी अथवा कोर्स न घेता केवळ स्वत: जिद्दीच्या व इच्छा शक्तीच्या जोरावर संगणकाच्या दोन वेबवाईट स्वत: तयार केल्या.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांची मुंबई येथे राज्यस्तरावरील शैक्षणिक परिषदेसाठी निवड झाली होती. अफाट जिद्द व केवळ बौद्धिक वापरून काहीतरी नवीन आत्मसात करण्याच्या हेतूने, या दोन शिक्षकांनी वेबसाईट तयार करून माणच्या प्राथमिक शाळांमध्ये संगणक प्रणालीचे काम सुरू केले.
सध्या सालगुडे-मार्डी केंद्रातील माळवाडी, वरकुटे, म्हसवड येथे कार्यरत असून, त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. सीआरसीमार्डी. ब्लॉगस्पॉट. कॉम या नावाने वेबसाईट तयार केली तर बालाजी जाधव यांनी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.सीआरसीम्हसवडएनओ ३. ब्लॉगस्पॉट. इन या नावाने वेबसाईट तयार केली.
बालाजी जाधव या शिक्षकाने तर जिल्ह्यामध्ये प्रथमच म्हसवडसारख्या ग्रामीण भागात मागील वर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सचा प्रयोग यशस्वी केला होता. सध्या त्याच्या ब्लॉगवरून संपूर्ण महाराष्ट्राला मोफत शिष्यवृत्तीच्या आॅनलाईन टेस्टच्या माध्यमातून दररोज नवनवीन प्रश्नपत्रिका देऊन त्याचा निकालही क्षणार्धात पाहता येऊ लागला की, ज्याचे आज बाजारात बेसुमार पैसे मोजावे लागतात. दररोज १० नवनवीन प्रश्न अपडेट केले जातात.
सर्व इयत्तावार महापाठ, स्वाध्याय उपलब्ध करून दिलेत. सर्व इयत्तांच्या कविता प्रश्नपेढ्या वाचनालय प्रयोगशाळा संचाची माहितीसह सर्व शैक्षणिक बाबींची माहिती या साईटवर आहे.
रामभाऊ सालगुडे यांनी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.सीआरसीमार्डी. ब्लॉगस्पॉट. कॉम या साईटवर शासन निर्णय, शासनाची परिपत्रके, मान्यवरांचे लेख, शैक्षणिक क्लृप्त्या , शालेय पोषण आहार प्रणाली आदी विषयांची माहिती उपलब्ध आहे. याचा सर्वांनाच चांगला फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बालाजी जाधव व रामभाऊ सालगुडे हे दोन प्राथमिक शिक्षक सातारा जिल्ह्यातील पॅटर्न महाराष्ट्रभर सादर करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, वामनराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे.

Web Title: Teacher teacher to state teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.