रानाकडं दिसला तर हातपाय काढीन धमकी दिल्यानंच शिक्षकाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST2021-07-24T04:15:14+5:302021-07-24T04:15:14+5:30

फिर्यादीत त्यांनी म्हटले की, माझे वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, रमेश ...

The teacher strangled him after threatening to remove his limbs if he saw Rana | रानाकडं दिसला तर हातपाय काढीन धमकी दिल्यानंच शिक्षकाने घेतला गळफास

रानाकडं दिसला तर हातपाय काढीन धमकी दिल्यानंच शिक्षकाने घेतला गळफास

फिर्यादीत त्यांनी म्हटले की, माझे वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, रमेश मोहन यादव ( ) व हनुमंत बागल () यांना १४ लाख रुपये देऊन जमीन मला दिली पण त्यांनी नंतर जमिनीचा ताबा दिला नाही, उलट मलाच दोघेही दम देत आहेत. रानाकडे दिसला तर तुझा पाय काढीनं व हात काढीनं असं म्हणत आहेत. त्यामुळे मी हे पाऊल उचलले आहे त्यानंतर गणेश नगर येथील आमचे घरी वडिलांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

त्यानुसार रमेश मोहन यादव व हनुमंत आप्पा बागल (रा. गुळसडी) यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप करीत आहेत.

---

Web Title: The teacher strangled him after threatening to remove his limbs if he saw Rana