शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची बैठक उधळली; जिल्हा परिषदेत मराठा समाज

By Appasaheb.patil | Updated: October 30, 2023 13:42 IST2023-10-30T13:42:17+5:302023-10-30T13:42:33+5:30

सोलापूर : शिक्षक मतदार संघाचे भाजपचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात शिक्षक संघटनेची बैठक घेत असताना ...

Teacher MLA Dnyaneshwar Mhatre's meeting broke up; Maratha community in Zilla Parishad | शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची बैठक उधळली; जिल्हा परिषदेत मराठा समाज

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची बैठक उधळली; जिल्हा परिषदेत मराठा समाज

सोलापूर : शिक्षक मतदार संघाचे भाजपचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात शिक्षक संघटनेची बैठक घेत असताना एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत काहीजण आले आणि आमदार म्हात्रे यांची बैठक उधळत त्याना तेथून जाण्यास भाग पाडले.

त्यानंतर आमदार म्हात्रे हे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेण्यासाठी आले होते. सीईओ यांच्या भेटीनंतर बैठक घेत असताना मराठा समाज आक्रमक होऊन त्यांची बैठक उधळली. त्यांना दालनाच्या बाहेर काढत जिल्हा परिषदेच्या बाहेर नेऊन सोडले.

यावेळी जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता, गोंधळाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.

Web Title: Teacher MLA Dnyaneshwar Mhatre's meeting broke up; Maratha community in Zilla Parishad