सोलापुरातील शिक्षक भारतीच्या लढ्याला मोठे यश; महत्वाच्या तीन मागण्या उपोषणस्थळीच मान्य

By Appasaheb.patil | Updated: August 15, 2023 18:51 IST2023-08-15T18:51:23+5:302023-08-15T18:51:40+5:30

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे  व शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी संघटनेच्या महत्वाच्या तीन मागण्या लगेच मान्य केल्या.

Teacher Bharti's fight in Solapur a big success; Three important demands are accepted only at the place of hunger strike | सोलापुरातील शिक्षक भारतीच्या लढ्याला मोठे यश; महत्वाच्या तीन मागण्या उपोषणस्थळीच मान्य

सोलापुरातील शिक्षक भारतीच्या लढ्याला मोठे यश; महत्वाच्या तीन मागण्या उपोषणस्थळीच मान्य

सोलापूर : कै. हणमंत काळे यांच्या कुटुंबीयास न्याय मिळवून देण्यासाठी व शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराच्या विरोधात शिक्षक भारती संघटनेच्या वतीने चालू केलेले आमरण उपोषण शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे  व शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी संघटनेच्या महत्वाच्या तीन मागण्या लगेच मान्य केल्या तसेच इतर प्रलंबित प्रश्न पंधरा दिवसाच्या कालावधीत निकाली काढू अशी हमी दिली. शिक्षक भारती संघटनेचे कार्यवाह प्रकाश शेळके यांच्याशी चर्चा करून आजचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. 

यावेळी रियाजअहमद अत्तार, सुरेश कणमुसे, प्रकाश अतनूर, शशिकांत पाटील, राजकुमार देवकते, शाहू बाबर, शरद पवार, मल्लिकार्जुन पाटील, अमोल तावसकर, सुहास छंचुरे, मायाप्पा हाके, उमेश कल्याणी, नितीन रुपनर, अभिनंदन उपाध्ये, शरीफ चिक्कळी, इक्बाल बागमारू, पंढरीनाथ कामत, नौशाद शेख, विजयकुमार गुंड, रणजित दडस, सज्जन मागडे, ज्ञानेश्वर लेंडवे, राजेंद्र मोरे, तगारे सर, अरविंद माळवदकर, नसिमबानो अन्सारी, यास्मिन अन्सारी, नौशाद सय्यद यांच्यासह जिल्हाभरातील संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Teacher Bharti's fight in Solapur a big success; Three important demands are accepted only at the place of hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.