तडीपार ओंकार वर्षातच आला शहरात, गुन्हा दाखल
By दिपक दुपारगुडे | Updated: May 17, 2023 17:46 IST2023-05-17T17:45:47+5:302023-05-17T17:46:02+5:30
४ एप्रिल २०२२ रोजी पासून दोन वर्षाकरीता सोलापूर शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले होते.

तडीपार ओंकार वर्षातच आला शहरात, गुन्हा दाखल
सोलापूर : तडीपार आदेशाचा भंग करुन शहरात वावरत असतांना तडीपार आरोपीस ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार उर्फ नायट्या संतोष नलवडे ( वय २०, रा. लक्ष्मी पेठ, गवळी वस्ती ) असे त्या आरोपीचे नाव आहे.
नलवडे यास पोलीस उपायुक्त यांनी ४ एप्रिल २०२२ रोजी पासून दोन वर्षाकरीता सोलापूर शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले होते. या तडीपार आदेशाचा अंमल चालू असताना त्याने पूर्व परवानगी शिवाय तडीपार आदेशाचा भंग करुन शहारातील मरीआई चौकात मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी विनोद व्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.