शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
8
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
9
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
10
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
11
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
12
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
13
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
14
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
15
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
16
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
17
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
18
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
19
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
20
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!

अनुदानाची गोडी : नव्याने ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 09:10 IST

संस्थांनी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले होते. 

अरुण बारसकर, लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर : जानेवारी ते मार्चमधील अनुदानासाठी राज्यातून २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. आता त्यात दुपटीहून अधिक संस्थांची भर पडत जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. मागील अनुदानाला मुकलेल्यांसह राज्यातून ८०४ दूध संस्थांना लाॅगीन आयडी देण्यात आला आहे. 

राज्यात दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर पाच रुपये अनुदान देण्याचा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत दिलेल्या अनुदानासाठी राज्यातून १८ जिल्ह्यांतील २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव आले होते. त्या संस्थांनी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले होते. 

जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी प्रति लीटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २३ जिल्ह्यांतील ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव अनुदानासाठी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाकडे दाखल झाले आहेत.

शासन ते शेतकरी अशी दूध अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जानेवारी ते मार्चच्या अनुदानासाठी २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव होते. जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव आले आहेत. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दूध अनुदानाची रक्कम राज्यात प्रथमच जमा होत आहे. - प्रशांत मोहोड,आयुक्त, दुग्ध विकास

जानेवारी ते मार्च - ऑगस्ट ते ऑक्टोबर दाखल प्रस्तावपुणे (३२ — ८१), सातारा (२४ — ५८), सोलापूर (१८ — ८९), कोल्हापूर (१२ — ००), सांगली (१२ — ३०), नागपूर (०३ — ०४), गोंदिया (०० — ०१) , वर्धा (०० — ०१),  भंडारा (०२ — ०२), अहमदनगर (७४ — १६०), जळगाव (०२ — १२), नाशिक ( १८ — ५२), धुळे (०३ — ०९), बीड (०६ — १२), छ. संभाजीनगर (१२—२२), धाराशिव (१३ — ३३), जालना (०१ —०४), लातूर (०१ — ०६), नांदेड (०० — ०४), परभणी (०० — ०४), अमरावती (०० — ०२), बुलढाणा ( ०२ — ०२), यवतमाळ (०० — ०२).एकूण — २४४ — ५९० 

टॅग्स :milkदूधSolapurसोलापूर