शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ऊसदर आंदोलनासाठी स्वाभिमानी रस्त्यावर; टायर पेटवून ऊस वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:39 IST

ऊसदर आंदोलन चिघळण्यास सुरूवात; दुष्काळ, पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत

पंढरपूर : कोल्हापूर येथे झालेल्या ऊस परिषदेत यावर्षी उसाला एकरकमी एफआरपी व १४ टक्के वाढ मिळावी, यासाठी कारखानदारांनी हमी द्यावी अन‌् कारखाने सुरू करावेत, अशी घोषणा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी करूनही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी १७०० रूपयांप्रमाणे उसाचा पहिला हप्ता काढला आहे. याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी रात्री युटोपियन साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून, टायर पेटवून निषेध केला. त्यामुळे ऊसदर आंदोलन चिघळण्यास सुरूवात झाली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जिल्ह्यातील सर्रास साखर कारखान्यांनी तीन हजार रूपयांच्या आसपास उसाची एफआरपी जाहीर केली असताना सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारच शेतकऱ्यांवर अन्याय करून चेष्टा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

अगोदरच दुष्काळ, पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आहे. यावर्षी किमान जाणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व १४ टक्के वाढ देऊन साखर कारखानदार, सरकार शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करेल, अशी अपेक्षा असताना सोलापूर जिल्ह्यात युटोपियन साखर कारखान्याने सर्वात अगोदर १७०० रूपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व संघटनांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी प्रत्येकवर्षी कै. माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाचा पहिला हप्ता जाहीर करून उसदराची कोंडी फोडण्याचे काम केले होते; मात्र त्यांच्यानंतर त्यांच्याच विचाराने चालणाऱ्या साखर कारखान्याने १७०० रूपये पहिला हप्ता जाहीर केल्याने इतर कारखाने त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाहीत, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे युटोपियनने पुढाकार घेऊन वाढीव हप्ता जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे.

वाहने अडविली, टायर पेटवून केला निषेधस्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी रात्री ओझेवाडी, सातारा नाला, सोनके, बाजीराव विहीर येथे विविध साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक वाहने अडविली. काही ठिकाणच्या मार्गावर टायर पेटवून जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आता ऊस गाळप हंगाम हळूहळू सुरू होत असताना स्वाभिमानीने उगारलेल्या ऊसदर आंदोलनामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक व कारखानदार, संघटना यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. दरवाढ मिळेपर्यंत स्वाभिमानी संघटना आंदोलनावर ठाम आहे.

यापूर्वीही वेळोवेळी आम्ही जिल्ह्यातील साखर कारखानदारांना एकरकमी एफआरपी व १४ टक्के दरवाढीची विनंती केली होती. मात्र प्रत्येकवेळी आम्हाला आश्वासनावर थांबविण्यात आले. मात्र ती आश्वासने कारखानदारांनी पाळली नाहीत. किमान २५०० रूपये पहिला हप्ता मिळावा, १४ टक्के दरवाढ मिळावी, अन्यथा स्वाभिमानी आणखी आक्रमक होऊन आंदोलन करेल. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे.- सचिन पाटील, तालुकाध्यक्ष (स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :SolapurसोलापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने