शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; रेल्वेत खोकणाऱ्या कोरोना संशयित कतार रिटर्न प्रवाशाला दौंडमध्येच रोखले

By appasaheb.patil | Updated: March 21, 2020 19:47 IST

उद्यान एक्सप्रेस; कोरोना संशयित रूग्णास पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले

ठळक मुद्दे- दौंड रेल्वे स्थानकावर उडाला गोंधळ- संशयित प्रवाशाला हलविले पुण्याला- रेल्वे अधिकाºयांची तत्परता, प्रवाशांची केली तपासणी

सोलापूर : मुंबईहुन गुलबर्ग्याकडे निघालेल्या उद्यान एक्सप्रेसमधील कोरोना संशयित (क्वारंटाइन) रेल्वे प्रवाशाला दौंडमध्येच रोखण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले़ दरम्यान, खबरदारी म्हणून एस ५ या डब्यातील ५६ लोकांची तपासणी करून त्यांना १४ दिवस घराबाहेर पडू नका अशी सक्त सुचना देऊन सोडण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुलबर्गा येथील एक तरूण कोरोना संशयित रूग्ण २० मार्च रोजी विमानाने कतार (आखाती देश) येथुन  निघून २१ मार्च रोजी दुपारी २़३० वाजता  तो मुंबई विमानतळावर दाखल झाला होता़ त्यानंतर तो मुंबई विमानतळावरून अ‍ॅटो रिक्षाने अंधेरी रेल्वे स्टेशनवर गाठले होते.

 दरम्यान, लोकल ट्रेनने प्रवास करून तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईच्या रेल्वे स्थानकावर दाखल झाला़ तेथुन गाडी क्रमांक ११३०१ उद्यान एक्सप्रेस कोच नंबर एस ५ सीट नंबर ७१ वर बसला होता़ याचवेळी तिकीट तपासणी करण्यासाठी आलेल्या तिकीट निरीक्षक (टीसी)ला त्याच्या हातावरील विमानतळावर मारलेला शिक्का दिसून आला़ शिवाय सतत खोकत व शिंकत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर तात्काळ तिकीट तपासणी अधिकाºयाने दौंड रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथकाला पाचारण केले़ दौंड रेल्वे स्थानकावर गाडी थांबवून संबंधित रूग्णास वैद्यकीय पथकाच्या ताब्यात दिले़ त्यानंतर त्या डब्यात असलेल्या ५६ प्रवाशांना बाहेर काढून त्यांची तपासणी करण्यात आली़ त्यानंतर गाडीचा एस ५ हा सॅनिटरायझरने स्वच्छ करून डबा सील केला़ तपासणीनंतर संबंधित प्रवाशांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सक्त सुचना देऊन सोडण्यात आल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलPuneपुणे