शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

युवकांकडून ‘पर्यावरण रक्षा, जगाची सुरक्षा’चा नारा

By appasaheb.patil | Updated: July 1, 2019 17:06 IST

होटगी स्टेशन येथील तरूणांनी घेतली वृक्षसंवर्धनाची जबाबदारी; स्वखर्चातून वृक्षलागवड

ठळक मुद्देवृक्षलगावड ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे समजून प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजेसमाजाने पुढाकार घेतल्यास पर्यावरणाचा नाश होणे थांबणार आहे़निसगार्तून माणसाला जिद्द, उत्साह मिळतो त्यामुळे प्रत्येकाने किमान एका झाडाचे पालकत्व घेऊन ते झाड मोठं केलं पाहिजे

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : वृक्षलगावड ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे समजून प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे. समाजाने पुढाकार घेतल्यास पर्यावरणाचा नाश होणे थांबणार आहे. निसगार्तून माणसाला जिद्द, उत्साह मिळतो त्यामुळे प्रत्येकाने किमान एका झाडाचे पालकत्व घेऊन ते झाड मोठं केलं पाहिजे. निसर्गाला सोबत घेऊन चाललो तर मानवाची प्रगती नक्की होईल हेच उद्देश डोळ्यासमोर होटगी स्टेशन (ता़ द़ सोलापूर) येथील युवकांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन झाडे लावण्यास सुरूवात केली़ नुसती झाडेच नाही लावली तर ती झाडे कायमस्वरूपी टिकविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली शिवाय विकतचे पाणी आणून झाडांना जीवदान देण्याचा काम त्या युवकांनी केले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन येथील २० ते २५ युवक एकत्र येऊन फेबु्रवारी महिन्यात ‘पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा’ या नावाने एक टीम तयार केली़ या टीमच्या माध्यमातून होटगी स्टेशन परिसरातील हनुमान मंदीर, भवानी मंदीर, उर्दू प्राथमिक शाळा, मुस्लिम कब्रस्थान, होटगी स्टेशन, सोलापूर रोड आदी भागात वृक्षलागवड केली.

एवढेच नव्हे हा उपक्रम सातत्याने पुढे असेच सुरू ठेवण्यासाठी आठवड्यातून प्रत्येक रविवारी वृक्षसंवर्धानाबरोबरच वृक्ष जोपासण्यासाठी टीममधील प्रत्येक युवकांनी जबाबदारी घेतली आहे़ हा स्तुत्य उपक्रम पाहून अनेक युवक आता या टीममध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येऊ लागली आहेत़ त्यामुळे वृक्षारोपन करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ याकामी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी सहकार्य करीत असल्याचे पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा या टिममधील युवकांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

गिफ्टच्या बदल्यात झाडहोटगी स्टेशन परिसरात एखाद्याचं लक्ष असेल किंवा वाढदिवस असेल तर पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा या टिमच्या माध्यमातून त्या नव्या वधुवरांना गिफ्ट न देता झाड देऊन ते झाड वाढेपर्यंतची जबाबदारी दिली जात आहे़ एवढेच नव्हे तर होटगी स्टेशन परिसरात होणाºया प्रत्येक कार्यक्रमात हार, तुरे, पुष्पगुच्छ आदी वस्तुने गौरव, सन्मान, सत्कार करताना अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्ष देण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे़ युवकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे परिसरातील लोकांनी या युवकांच्या कामाचे कौतुक केले आहे़ हा उपक्रम असाच कायम सुरू राहणार असल्याचं मत युवकांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणTemperatureतापमानdroughtदुष्काळ