पाण्यामार्फत पोटातून ऑक्सिजनचा पुरवठा कोविडमुक्तीसाठी एस.डब्ल्यू. थेरपीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:09+5:302021-05-14T04:22:09+5:30

कोरोना व्हायरसमुळे फुफ्फुसाची हानी होते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतो. या परिस्थितीत एस. डब्ल्यू. थेरपीचा वापर केल्याने रुग्णाचे ...

Supply of Oxygen from the Stomach through Water Therapy claims | पाण्यामार्फत पोटातून ऑक्सिजनचा पुरवठा कोविडमुक्तीसाठी एस.डब्ल्यू. थेरपीचा दावा

पाण्यामार्फत पोटातून ऑक्सिजनचा पुरवठा कोविडमुक्तीसाठी एस.डब्ल्यू. थेरपीचा दावा

Next

कोरोना व्हायरसमुळे फुफ्फुसाची हानी होते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतो. या परिस्थितीत एस. डब्ल्यू. थेरपीचा वापर केल्याने रुग्णाचे प्राण वाचवता येतील. इतर बऱ्याच सहवेदनांमुळे होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी होऊन त्यातून रुग्णांची मुक्तता होऊ शकते, असे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

एस. डब्ल्यू. थेरपी म्हणजे सॅच्युरेटेड वॉटर थेरेपी होय. या थेरपीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पाण्यामार्फत पोटातून करता येईल. एअरेटरचा (एअर पंप, जो फिश पाँन्डमध्ये वापरतात) वापर करून अतिथंड पाण्यात हवा सोडून त्यातील ऑक्सिजन विरघळवता येतो. एक लिटर पाणी सॅच्युरेटेड करण्याकरिता फक्त एक तास लागतो. या पद्धतीने बारा मिलिग्राम प्रति लिटरपर्यंत ऑक्सिजन पाण्यात विरघळवता येतो. त्याचे वास्तविक नैसर्गिक पद्धतीने साध्या पाण्यात हेच प्रमाण फक्त पाच ते सहा मिलिग्राम प्रति लिटर एवढेच असते. अशा प्रकारे तयार केलेले ५०० ते ८०० मिलिलिटर सॅच्युरेटेड वॉटर पिण्यायोग्य थंड असताना रुग्णाला प्यायला द्यायचे आहे.

पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचे असून, पिल्यानंतर पुढील एक ते दीड तास कुठल्याच प्रकारचा व्यायाम अथवा श्रम करायचे नाहीत. या काळात पाण्याचे शोषण लहान आतड्यामधील पेशींमध्ये व रक्तामध्ये निष्क्रिय शोषण (पॅसिव्ह ॲब्सॉरप्शन) या पद्धतीने होते. त्यामुळे साहजिकच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. ऑक्सिजन पाण्यात जरी कमी प्रमाणात विरघळत असला व रक्तात त्या प्रमाणात पाठवला जात असला तरी, शरीरातील ऑक्सिजन तुटवड्याच्या परिस्थितीत ते प्रमाण मोलाचे ठरते.

----

फुफ्फुसाला मिळते विश्रांती

पोटातून ऑक्सिजनचा पुरवठा केल्यामुळे फुफ्फुसाकडून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी कमी होते. त्यामुळे फुफ्फुसाला थोडी का होईना विश्रांती मिळते. याचा फायदा म्हणजे रुग्णाला आलेला थकवा कमी होण्याची शक्यता बळावते.

रुग्णाने या सॅच्युरेटेड थेरपीचा वापर केल्याने लहान आतड्यातील पेशी अतिकार्यक्षम होऊन पोटातील इतर विकाराच्या त्रासातून देखील रुग्णाची काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता वाढते, असे डॉ. कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.

----

क्वारंटाईन रुग्णांसाठी प्रभावी

या सॅच्युरेटेड वॉटर थेरपीचे दुष्परिणाम नसल्याने पोस्टकोविड तसेच घरीच क्वारंटाईन असलेल्या रुग्णांसाठी ही थेरपी प्रभावी ठरू शकते.

संशोधक डॉ. सुहास कुलकर्णी हे सूक्ष्मजीवशास्त्राचे निवृत्त प्रोफेसर व माजी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख असून मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. तसेच ते मराठी विज्ञान परिषद शाखा, बार्शीचे उपाध्यक्ष आहेत.

Web Title: Supply of Oxygen from the Stomach through Water Therapy claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.