पोलीस अधीक्षक मंडलिकांनी घेतली सूत्रे
By Admin | Updated: August 5, 2014 01:34 IST2014-08-05T01:34:19+5:302014-08-05T01:34:19+5:30
दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी त्यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.

पोलीस अधीक्षक मंडलिकांनी घेतली सूत्रे
सोलापूर : सहा महिन्यांतच सोलापूरकरांचा निरोप घ्यावा लागलेले ग्रामीण पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांची पुण्याला पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर नवे पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी त्यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. स्वागत अन् निरोप स्वीकारत नवे व मावळते पोलीस अधीक्षक खास बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झाले.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा आपला कसोसीने प्रयत्न राहील, असे सूत्रे स्वीकारल्यानंतर दत्तात्रय मंडलिक बोलत होते.
यापूर्वी अपर पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय मंडलिक यांनी जिल्ह्यात काम केले आहे. त्यामुळे त्यांना सोलापूर जिल्हा नवीन नाही.
नवे पोलीस अधीक्षक मंडलिक सूत्रे घेणार असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.